Web Exclusive | महावितरणकडून गोलमाल, शेतकऱ्यांना 30 हजार कोटींना लुटले? | ABP MAJHA

महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल ३३ हजार ८५६ दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरणसांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र २२ हजार ८५६ दशलक्ष युनिट एवढा शेतकऱ्यांचा वीज वापरअसल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झालं. त्यामुळे वाढीव वीज वापर वापर दाखवून महावितरणने शेतकऱ्यांकडून २२ हजार कोटी रुपये तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून आठ हजार २२५ कोटी रुपये लाटले. महावितरण मधून निवृत्त झालेले कनिष्ठ लेखेधिकारी जांनी या घोटाळ्याची माहिती अधिकारातून पाच वर्ष झटून माहिती संकलित केली त्यांच्याशी बातचीत केली त्यांनी सांगितले हा घोटाळा नेमका कसा घडला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola