Raj Thackeray | 'हिंदू जननायक' म्हणू नका, राज ठाकरेंचं आवाहन | ABP Majha
मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी चर्चा केली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मुंबईत मनसेने महामोर्चा काढला होता. या मोर्चानंतर राज ठाकरे यांना 'हिंदू जननायक' असं म्हटलं जाऊ लागलं होतं. मात्र मला हिंदू जननायक म्हणू नका असं राज ठाकरेंनी सर्वांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. मनसेच्या मोर्चावर शरद पवारांनी टीक केली होती. त्याविषयी बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं की, शरद पवार आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. राजकारणाच्या पलिकडे संबंध जपले जातात, महाराष्ट्राची तशी राजकीय परंपरा आहे.