Kartiki Ekadashi 2022 : वारीची परंपरा पिढ्यानपिढ्या पोहचवण्यासाठी प्रयत्न करु : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.  यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. दरम्यान आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सुरु करण्यात आलं... शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचंही प्रकाशन झालं. त्यानंतर फडणवीसांनी सपत्निक नामदेव वाड्याला भेट दिली... यावेळी देवेंद्र फडणवीस यांना नामदेव पगडी घालून त्यांचा सत्कार केला..  यावेळी अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.. त्यानंतर पंढरपूर ते घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram