Nitin Gadkari : गुंतवणूकीच्या दृष्टीने मिहानचंही मूल्यमापन करु, टाटाचं नितीन गडकरींना पत्र

Continues below advertisement

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या असताना टाटा समूहाने नागपूरच्या मिहान सेझमध्ये उत्सुकता दर्शवलीय...गुंतवणूकीच्या दृष्टीने मिहानचंही मूल्यमापन करु असं आश्वासन टाटा समूहाने दिलंयं. टाटा समूहाचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवलंय... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 7 ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष  नटराज चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपुरातील मिहान सेझमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत त्यांचे त्याकडे लक्ष वेधले होते. मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकोनाॅमिक डेव्हलपमेंट काऊंसिल अर्थात वेदने एक आराखडा तयार केला आहे.. त्याचा उल्लेखही गडकरी यांनी टाटा समूहाला पाठवलेल्या पत्रात केला होता... उद्योग विस्तारासंदर्भात वेदच्या संपर्कात राहू असं टाटा समूहाने गडकरींना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram