Majha Maharashtra Majha Vision | इतिहास अंगात भिनला पाहिजे, पण इतिहासात गुरफटून चालणार नाही - छगन भुजबळ

Continues below advertisement

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 'महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा त्याचा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शौर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. परंतु, आपण जर परदेशात गेलो तर तिथल्या गोष्टी पाहून असं वाटतं की, आपण किती मागे आहोत. इतिहासाबाबत सर्वांना प्रेम पाहिजे, त्यासंदर्भात सगळी माहिती पाहिजे, इतिहास अंगात भिनला पाहिजे. पण इतिहासात गुरफटून राहून चालणार नाही आपल्याला.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'कधी असं वाटतं की, आपला देश जपान, जर्मनी सारखा का नाही? ज्यांचा इतिहास पाहिला तर, या देशांनी अनेक गोष्टी सहन केल्या. राख रांगोळी होऊनही हे देश उभे राहिले. त्यांच्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. तसचं आपलं राज्यही याच देशांप्रमाणे सर्व गोष्टींनी सुसज्ज असायला हवं, असं मला वाटतं.'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram