Majha Maharashtra Majha Vision | Rajesh Tope Vision | आरोग्य विभागातील रिक्त जागा भरणार : राजेश टोपे
"आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष व्हायचंच. पण आता सगळ्या रिक्त जागा भरणार आहे. प्राथमिक सेवा देणारा आमचा विभाग आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील सगळ्या जागा भरणार आहेत. तसंच जिथे गरज आहे तिथे रुग्णालयं वाढवणार आहे," असा निर्धार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्रात अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 70 लाख टेस्टिंग केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
Tags :
Rajesh Tope Interviews Majha Maharashtra Majha Vision 2020 Health Minister Rajesh Tope Interview Majha Maharashtra Majha Vision Health Minister Rajesh Tope Coronavirus Covid 19