Kolhapur Water Dispute | इचलकरंजीला पाणी देण्यावरून संघर्ष, पाणी दिल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा

कोल्हापूरच्या दुधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देण्यास सहा तालुक्यांनी विरोध केला आहे. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून आज बिद्री गावातील पुलावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. जर सरकारने पाणी देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आलाय आहे. या सहा तालुक्यातील नागरिकांनी 20 वर्षांपूर्वी पाण्यासाठी महामार्ग रोखला होता. आता त्याच पाण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वाद आता चिघळणार हे नक्की झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola