Washim Rain : वाशिमला पावसाचा मोठा फटका, 22 गावांना पुराचा तडाखा

वाशिम जिल्ह्याला दोन दिवसांत पावसाने झोडपून काढलंय. या अतिमुसळधार पावसामुळे कारंजा आणि मानोरा तालुक्यातील नदीकाठच्या गावांसह सखल भागांमध्ये राहणाऱ्या लोकांचे हाल झाले.  कारंजा तालुक्यातील २२ गावांना पुराचा फटका बसला तर मानोरा तालुक्यातील २५ गावे पूरबाधित आहेत. यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. शेकडो एकर शेती ही पीकपेरणीसाठी योग्य नसल्यांचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड आज वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola