Washim Rain Damage | वाशिममध्ये पावसाचा कहर, रस्त्यांची दुरवस्था

वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी हानी झाली आहे. रिसोड तालुक्यातील आंचळ, जायखेडा, नेनसा या गावांजवळील पूल आणि रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. नेतनसा ते कोयाळी मार्ग पूर्णपणे खचला असून वाहतूक बंद आहे. नुकतेच डांबरीकरण केलेले रस्तेही खराब झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान झाले असून हळदीची लागवड, बांध आणि ड्रिप सिस्टम वाहून गेली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola