Raj Uddhav Morcha: राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार
राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला एकत्र मोर्चा काढणार आहेत. संजय राऊत म्हणाले, 'दोन्ही बंधू मनाने एकत्र आलेच आहेत.' मराठी भाषा, स्वाभिमान, अस्मिता आणि मुंबईवरील आक्रमण या विषयांवर एकत्र लढा उभारण्याची गरज दोन्ही ठाकरे प्रमुखांना वाटत आहे. राऊत यांनी 'मराठी मनाने सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे' अशी भूमिका मांडली.