Washim : दिगंबर आणि श्वेतांबरपंथामध्ये मंदिरावरुन वादाचा नवा अंक सुरु होण्याची शक्यता

सध्या वाशिममध्ये एक वेगळाच वाद निर्णाण होण्याची शक्यता आहे.. जैन धर्मियांची काशी अशी ओळख असलेल्या शिरपूर जैन इथल्या भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराचा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. तसं बघायला गेलं तर, देव कुणाचा यावरून दिगंबर आणि श्वेतांबरपंथामध्ये गेल्या अनेक दशकांपासून वाद सुरु होता..  मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी याच वादावर पडदा टाकण्यासाठी उच्च न्यायालयाने मंदिर उघडण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर श्वेतांबर पंथियाने मंदिरावर आपला हक्क दाखवत मंदिराला टाळं लावलं,मात्र दिगंबर पंथाने यावर आक्षेप घेत मंदिरात घुसून दर्शन घेतलं.  त्यामुळे आता या मंदिरावरुन नव्या वादाचा अंक सुरु होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola