Washim Mangrulpir Controversy : नगरपालिकेवरील उर्दुतील नाव झाकण्याला विरोध, मंगरुळपीरमध्ये तणाव
Continues below advertisement
Washim Mangrulpir Controversy : नगरपालिकेवरील उर्दुतील नाव झाकण्याला विरोध, मंगरुळपीरमध्ये तणाव
वाशिममधील मंगरुळपीर नगरपालिका इमारतीवरील उर्दू भाषेत लिहिलेलं नगरपालिकेचं नाव पुसल्याने सध्या मंगरुळपीरमध्ये तणावाचं वातारण आहे. नगरपालिकेच्या इमारतीवर गेल्या अनेक दशकापासून मराठीसह उर्दू भाषेत नगरपालिका मंगरुळपीर असा दर्शनीय भागावर उल्लेख आहे. मात्र नगरपालिकेचं नाव हे फक्त राजभाषेत असावं या मागणीसाठी मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सतीश हिवरकरसह काही कार्यकर्ते उपोषणास बसले होते. दरम्यान नगरपालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत उर्दूसह मराठी भाषेतील नावं पांढरा रंग मारून झाकण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement
Tags :
Washim