Washim teak tree : वाशिम जिल्ह्यात सागवान वृक्षांवर अळ्यांचा प्रादुर्भाव
Continues below advertisement
Washim teak tree : वाशिम जिल्ह्यात सागवान वृक्षांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाशिम जिल्ह्याच्या वनपरिक्षेत्रात मोठ्या क्षेत्रात सागवानाचे झाड धोक्यात आले आहेत. या झाडांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय. अळ्यांनी हिरव्यागार झाडांची पाने खाल्ल्याने पानांची चाळण झाली आहे. हिरवीगार पाने अळ्यांमुळे पिवळी पडलीत. आणि झाडावरून अक्षरशा अळ्या पडताना दिसतात. त्यामुळे सागवान वृक्षांच्या वाढीस मोठा धोका निर्माण झाला आहे. सागाच्या झाडांना खूप मागणी आहे. मात्र, अळ्यामुळे सागवान वृक्षांची वाढ संकटात आल्याने याचा परिणाम भविष्यात मागणी-पुरवठ्यावर होऊ शकतो.
Continues below advertisement