
Washim Crime : वाशिमच्या वाघजाळी परिसरात हुंडाबळीचा प्रकार, हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या
Washim Crime : वाशिमच्या वाघजाळी परिसरात हुंडाबळीचा प्रकार, हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या
वाशिमच्या वाघजाळी हुंडाबळीचा प्रकार समोर आलाय. मेघा शिंदे या नवविवाहितेची हुंड्यासाठी गळा चिरुन हत्या करण्यात आली. मेघा शिंदे या तरुणीचा विवाह वाघजाळी इथल्या गजानन शिंदे या तरुणाशी काही महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी कार घेण्यासाठी मेघाच्या माहेरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. मागणीनुसार काही पैसे चेकद्वारे दिल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. मात्र आणखी रक्कमेसाठी छळ सुरु होता. अखेर काल धारदार शस्त्राने गळा चिरुन मेघाला जखमी केलं. जखमी अवस्थेत तिला वाशिमच्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्राणजोत मालवली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर पतीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.