Washim Jain Protest : वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन समाजातील दिगंबर पंथीयांचा मोर्चा

वाशिममध्ये जैन समाजातील दिगंबरपंथीय आज रस्त्यावर उतरले आहेत..... शिरपूर येथे मूर्तीचे लेपन करताना मूर्तीचं मूळ रूप बदलण्यात येत असल्याचा गंभीर आरोप दिगंबर पंथीयांनी केला आहे...दुसऱ्या लेपन प्रक्रियेत दिगम्बर पंथीयांना बाजूला ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय तसंच सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनंतरही मंदिराची किल्ली केवळ एका पक्षकाराकडेच का असा सवाल करण्यात आलाय...त्या विऱोधात आज हा मोर्चा काढण्यात आलाय..दरम्यान पोलिसांकडून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडवण्यात आलाय...तर निवेदन देण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी दिली गेली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola