Political Reactions on pawar :शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरून राजकीय घमासान
महाविकास आघाडीत जागावाटप निश्चित नाही त्यामुळे मी तशी भूमिका मांडली त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. शरद पवार यांनी काल अमरावतीत महाविकास आघाडी पुढे राहील की नाही या बद्दल माहित नाही असं विधान केलं होतं त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आज यावर त्यांनी एबीपी माझावर स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान शरद पवार यांच्या भूमिकेनंतर विविध राजकीय प्रतिक्रीया येतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.