Ankita Lokhande's Flat | अंकिता लोखंडेच्या मालाडमधील फ्लॅटचे हप्ते सुशांत भरत होता? काय आहे सत्य?

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आर्थिक व्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयही तपास करत आहे. ईडी अधिकृतरित्या तपासाची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मीडियामध्ये आलेल्या काही वृत्तात दावा केला जात आहे की, "सुशांत सिंह राजपूत त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेच्या एका फ्लॅटचे हफ्ते भरत होता." मात्र अंकिताने हे वृत्त फेटाळलं आहे.

अंकिता लोखंडेच्या माहितीनुसार, तिने हा फ्लॅट 1.35 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता आणि त्याचे हफ्तेही तिच फेडत आहे. 2010 मध्ये 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेदरम्यान सुशांत आणि अंकिता यांच्यात जवळीक वाढली. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान दोघे लिव्ह इनमध्ये होते आणि याच फ्लॅटमध्ये राहत होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. या फ्लॅटबाबत अंकिताने आता स्पष्टीकरण दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola