Parth Pawar | पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न, बारामतीत बैठक
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. यानंतर नाराज असलेल्या पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी बारामतीत बैठक झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, काका श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात काल रात्री ही बैठक झाली असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार पुण्यातील शिवाजीनगर येथील मोदीबाग घरी पोहोचले आहेत. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पवार प्रथमच पुण्यात आले आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार पुण्यातील शिवाजीनगर येथील मोदीबाग घरी पोहोचले आहेत. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पवार प्रथमच पुण्यात आले आहेत.