Wardha Bogas Seeds : वर्ध्यातील बोगस बियाणे प्रकरणी एसआयटीची स्थापना, अनेक बडे मासे गळाला लागणार?
Continues below advertisement
वर्ध्यातील बोगस बियाणे प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केलीय. या एसआयटीमध्ये १५ सदस्य असून यातील पाच जण अधिकारी आहेत. या प्रकरणी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. वर्ध्यातील म्हसाळा परिसरात दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी बोगस बियाणे कारखाना उद्ध्वस्त करून बनावट बियाणे विक्री करणार्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात एकून १५ जणांविरोधात गुन्हे दाखल करून १० जणांना अटक केली होती. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटमध्ये अनेकजण असून काही बड्या असामी असण्याची शक्यता सांगितली जातेय.
Continues below advertisement