Ganpati by Muslim Man : गणेश मंडळाचा एकतेचा संदेश, मुस्लिम युवकाकडून 15 वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना
वर्ध्यातल्या तळेगाव शामजी पंत इथल्या बाल एकता गणेश मंडळाकडून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय. गेल्या 15 वर्षांपासून एक मुस्लिम समाजाचा युवक इथं गणपतीची प्रतिष्ठापना करतोय. कलाम शाह असे या युवकाचं नाव आहे..हा युवक एक वाहन चालक असून हा गणपतीचे दहा दिवस मंडपातच राहून गणरायाची सेवा करतो. त्यामुळे जिल्ह्यात कलमा आणि या मंडळाचं कौतुक होतंय.