Aslam Shaikh आणि Aaditya Thackeray यांच्या भुमिकेची चौकशी करा : Kirit Somaiya : ABP Majha
मुंबईत मढ इथं एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता चौकशीची मागणी केलीय. मविआ सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केलीय. सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. या घोटाळ्यात गुंतलेल्या पर्यावरण आणि बीएमसी अधिकाऱ्यांचं निलंबन आणि बदली करावी अशी मागणीही सोमय्या यांनी केलीय.