मुंबई, ठाण्यात नाकाबंदी, पोलीस बंदोबस्त वाढवला, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही - विश्वास नांगरे पाटील
मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही पूरण खबरदारी घेत आहोत, आम्ही मुंबईतील सर्व पोलिस स्टेशनच्या माध्यमातून मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मौल्वी या सर्वांना संवाद साधला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला शांतता ठेवण्याचं आव्हान केलं आहे. अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. आम्ही मुंबईत पेट्रोलिंग वाढवली आहे. त्याच बरोबर संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढला आहे, असंही त्यांनी सांगितलं.