Virat Kohali : आरसीबीच्या ट्विटरमध्ये विराटऐवजी राहुलचा फोटो : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्याची बातमी एक वाजण्याच्या सुमारास कानोकानी झाली. पण विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या आयपीएल फ्रँचाईझीला ही बातमी तासभर आधीच मिळाली होती का? ही शंका येण्याचं कारण म्हणजे आरसीबी ट्विटस या हॅण्डलवरून बारा वाजता करण्यात आलेली पोस्ट. जोहान्सबर्गच्या या कसोटीत लोकेश राहुल कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी उतरला, त्या वेळी भारतात दुपारचा एक वाजायला आला होता. पण आरसीबी ट्विट्सनं त्याच्या तासभर आधीच जोहान्सबर्ग कसोटीविषयी केलेल्या पोस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीऐवजी बदली कर्णधार लोकेश राहुलचा फोटो ठेवला आहे. आरसीबीट्विट्सची ही पोस्ट म्हणजे निव्वळ योगायोग आहे की, विराट कोहली पाठीच्या दुखापतीमुळं माघार घेत असल्याची माहिती त्यांना आधीच मिळाली होती. आता यापुढचा योगायोग म्हणजे विराटनं जोहान्सबर्ग कसोटीतून माघार घेतल्यामुळं त्याला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कारकीर्दीतल्या कसोटी सामन्यांचं शतक साजरं करता येऊ शकतं. आणि बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम हे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं माहेरघर आहे.