Hingoli Oxygen Shortage | हिंगोलीत ऑक्सिजन मिळाला नसल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप, पत्नीचा रुग्णालयाबाहेर टाहो

Continues below advertisement

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या बाहेर महिला टाहो फोडत असून सध्या त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासंदर्भात या महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.पेंटर म्हणून ओळख असलेले संजय अंभोरे यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. नंतर उपचारादरम्यान त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. या प्रकरणात ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा उपलब्ध असल्याचे सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram