मुंबई पोलिसांना क्षमतेनुसार काम करू दिलं जात नाही, सत्तेतच गुंड प्रवृत्तीचे लोक बसलेत - आशिष शेलार

"बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात," अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे वारंवार अंगुलीनिर्देश केला जात आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रक जारी करुन आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यातच आता बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहेत. शिवाय बहुतांश सेलिब्रिटी वांद्रे भागात राहतात. या अनुषंगाने प्रश्न विचारला असता आशिष शेलार म्हणाले की, "वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून अनेक प्रामाणिक मतदार तिथे राहतात. बॉलिवूडची लोक तिथे राहतात. मी बॉलिवूडच्या स्वत: पार्ट्यांना जातो असं परिपत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत, असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वला राहतात."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola