Vikram Misri on Pak Voilattion : भारतीय सैन्याला कारवाई करण्यासाठी स्वातंत्र्य : विक्रम मिस्री

Continues below advertisement

Vikram Misri on Pak Voilattion : भारतीय सैन्याला कारवाई करण्यासाठी स्वातंत्र्य : विक्रम मिस्री

 भारताच्या विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला खडसावलं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं हे निंदनीय असल्याचं विक्रम मिसरी यांनी म्हटलं. 

विक्रम मिसरी म्हणाले....

गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. भारतीय सैन्याकडून याचं उत्तर दिलं जात आहे. या सीमेवरील अतिक्रमणाचा सामना करत आहे. हे अत्यंत निंदनीय असून पाकिस्तान याला जबाबदार आहे. पाकिस्ताननं हे गांभीर्यानं घ्यावं आणि अतिक्रमण रोखण्यासाठी तातडीनं योग्य कारवाई करावी. सैन्याचं यावर योग्य लक्ष आहे. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी आणि रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.   

गेल्या काही तासांपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान केलं जातंय. दोन्ही देशांच्या डीजीएमओकडून करण्यात घेण्यात आलेल्या निर्णयाचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola