Bhiwandi Building Collapse | भिवंडीत इमारत कोसळून 20 जणांचा मृत्यू, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून पाहणी
Continues below advertisement
भिवंडीत इमारत दुर्घटनेला 32 तास उलटून गेले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे या इमारत दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्ती मदत पुनर्वसन विभागाचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आले होते त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया व प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमचे अधिकाऱ्यांशी चर्चाही केली इमारत कोसळणे मागं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं वडेट्टीवार यांनी सांगितले की जर ही इमारत लिगल असेल तर मृतकांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल तसेच जखमींना पन्नास हजार रुपये देखील जाहीर करण्यात आलंय.
Continues below advertisement