Vijay Vadettiwar | विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त, क्रिमिनल केसेस लपवल्याचा आरोप
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. नंतर कारवाई झाली नाही तेव्हा ते हायकोर्टात गेले.