Maharashtra Floods | वायुसेनेच्या विमानातून पूरग्रस्तांना अन्न पोहोचवण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवार यांचा हवाई दौरा

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याने कहर केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज- पिंपळगाव- बेलगाव रणमोचन- बेटाळा -खरकाडा या गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला आहे. या भागातील वैनगंगा नदीची पूरस्थिती दाखवणारे ड्रोन व्हिज्युअल्स परिस्थतीची गंभीरता दाखवत आहे. वैनगंगा नदी वाहत असलेल्या भागांमध्ये पाऊस नसताना शेती व घरे पाण्याखाली गेल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस पडलेला नाही मात्र वैनगंगा नदीच्या दोन्ही काठावरील गावे पुराच्या वेढ्यात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola