Vidhansabha अध्यक्षपद निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकार राज्यपालांना पुन्हा विनंतीपत्र पाठवणार

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकार राज्यपालांना  पुन्हा विनंतीपत्र पाठवणार आहे. निवडणूक प्रक्रियेला मान्यता देण्याबाबत हे पत्र पाठवलं जणार आहे. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर हे पत्र पाठवण्यात येणार आहे. निवडणुकीबाबत राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती या पत्रातून करण्यात येणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात जे बदल करण्यात आले आहेत त्याचा कायदेशीर अभ्यास करत असल्याचे राज्यपालांनी सरकारला कळवलंय. त्यामुळे आता राज्यपालांनी कायदेशीर सल्ला लवकर घेऊन सरकारची विनंती मान्य करावी अशी विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवलं जाणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola