नारायण राणे-विनायक राऊतांमध्ये खडाजंगी, नारायण राणेंनी सदस्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. दोडामार्गातील तिलारी धरण डावा कालवा फुटल्याच्या विषया वरून भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी मांडलेल्या भुमिकेला शिवसेनेचे सदस्य बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या सदस्यांचा सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. याच विषयावरून राणे आणि राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पहायला मिळाली. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिल त्यानंतर सभागृहातील कामकाज शांततेत झालं.
Tags :
Raut Rane Fight Vinayak Raut Fight Narayan Rane Fight Vinayak Raut Nitesh Rane Narayan Rane Sindhudurg Nilesh Rane