जालन्यातील भोकरदन येथे 20 फूट उंच पुलावरून कार कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे एक कार पुलावरून 20 फूट खोल खाली कोसळली, यात कुठलीही जीवित हानी झाली नसून गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला, कालच्या या घटनेचा थरारक व्हिडीओ cctv मध्ये कैद झालाय, काल सायंकाळ च्या सुमारास भोकरदन येथून जाफराबाद कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार खाली कोसळली, या कार मध्ये फक्त चालक होता, ज्याला सुदैवाने कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.