vaccine : कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा विचार - अजित पवार
कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर काही निर्बंध घालण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. लस उपलब्ध असतानाही लोक दुसरा डोस घेत नाहीत. पहिला डोस घेऊन ८४ दिवस उलटूनही लस न घेणाऱ्यांची संख्या राज्यात दीड ते पावणेदोन कोटी इतकी आहे. त्यामुळे अशा लोकांनी लस घ्यावी यासाठी काही बंधनं टाकणार असल्याचं अजित पवार म्हणाले.