Bipin Rawat Death : जनरल रावत यांचं अपघाती निधन ABP MAJHA
Continues below advertisement
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर आता असाच एक अपघात आणि त्यांच्यांतील साम्य यांची चर्चा सुरु झालीय. जनरल रावत यांच्याप्रमाणेच तैवानचे चीफ ऑफ जनरल स्टाफ शेन यी मिंग यांचंही गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. विशेष म्हणजे शेन यी मिंग हेदेखिल चीनच्या आक्रमक भूमिकेविरोधात लढणारेे अधिकारी होते. संरक्षण तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी ट्विट करून या दोन अपघातातील साम्य अधोरेखित केलंय. २०२० मध्ये झालेल्या अपघातात तैवानचे लष्करप्रमुख मिंग यांचं ब्लॅक हॉग हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळलं होतं. त्यात मिग आणि इतर सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. चेलानी यांनी या दोन अपघातातील साम्य सांगताना, त्यात चीनी आक्रमकतेविरोधात लढणाऱ्या संरक्षण विभागातील प्रमुख व्यक्तींना गमवावं लागलंय, असं म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Helicopter हेलिकॉप्टर चर्चा General Bipin Rawat CDS Charcha हेलिकॉप्टर जनरल बिपीन रावत General Rawat Staff Shen Yi Ming