
कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे लसीकरण थांबवलं, ऑनलाईन नोंदणी करताना काय आहेत अडचणी?
Continues below advertisement
मुंबई : देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेत तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उद्या (17 जानेवारी) मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द करण्यात आले आहे.
सरकारने व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी तयार केलेल्या अॅप विकसित केलेल्या कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील लसिकरण रद्द करण्यात आले आहे. सोमवारी (18 जानेवारी) लसीकरण होण्याची शक्यता कमी आहे.
Continues below advertisement