Vacancies in Maharashtra Govt | राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक रिक्त पदं
मुंबई : महाराष्ट्रातल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये रिक्त पद ही एक मोठी समस्या आहे अशी कर्मचारी संघटनांची नेहमी तक्रार असते. त्या तक्रारीला पूरक अशी माहिती माहितीच्या अधिकारामधून बाहेर आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि विविध शासकीय विभागांमध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. राज्य सरकारने नितीन यादव यांना काल ही माहिती इमेल द्वारे दिली. ह्या माहिती मध्ये 31 डिसेंबर 2019 अखेर किती पदे रिक्त आहेत याचा तपशील देण्यात आला आहे.
Tags :
Vacancies In Maharashtra Govt Maharashtra Berojgari Maharashtra Vacancies Nitin Yadav Maharashtra Govt