Uttar Pradesh Election : . समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या घरात मोठी फूट

उत्तर प्रदेश निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या घरात मोठी फूट पडलीय. मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुलायम यांचे पुत्र प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर परत मुलायम आणि अखिलेश यांची स्तुती करून अपर्णा यांनी आपण कुटुंबासोबतच असल्याचे दाखवले होते. समाजवादाचे दुसरे नाव हे अखिलेश असल्याचे जाहीरपणे सांगत त्यांनी पक्षासोबत राहणार असल्याचा संदेश दिला होता. मात्र आता अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपमध्ये फाटाफूट करणाऱ्या अखिलेश यादव  यांना भाजपने त्यांच्या घरातूनच मोठा दणका दिल्याच्या चर्चा रंगल्यात.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola