Nagpur #Corona कोरोनाबाधित 13 वर्षीय रुग्ण 10 तास अॅम्ब्युलन्समध्येच, का होतंय रुग्णांकडे दुर्लक्ष?
Continues below advertisement
जस जसे नागपुरात कोविड पेशंट्स वाढायला लागले आहेत, तसं तसे परिस्थितीचे मॅनेजमेंट हे वाईट व्हायला लागले आहे. कोविड वॉर्डमध्ये तर काय होते हे एकदा पेशंट आत गेला की कळणे कठीण असते, पण एबीपी माझाला रुग्णालयातून रुग्णांनी चक्क आम्हाला बाहेर काढा असा टाहो फोडत संपर्क केला आहे. कोविड वॉर्डमध्ये तुंबलेल्या संडासांपासून तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे गोळा करण्याचा गोरख धंदा अशी सर्व किनार या कोविड मॅनेजमेंटला नागपुरात लागली आहे.
Continues below advertisement