लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त वेबिनारला अमित शाह संबोधणार, विनय सहस्त्रबुद्धेंची माहिती
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले अग्रणी नेते लोकमान्य टिळक यांचं स्मृतीशताब्दी वर्ष 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु होतंय. त्यानिमित्तानं स्वराज ते आत्मनिर्भर भारत या विषय़ावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचं आयोजन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संबोधनानं या वेबिनारची सुरुवात होणार आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी यानिमित्तानं होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. मंडालेतल्या भारतीय वकिलातीच्या कक्षाला लोकमान्य टिळक यांचं नाव देण्यात यावं यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचं विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं.