Ulhasnagar Market | उल्हासनगरमधील बाजारपेठ ओस, गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकानदारांना आर्थिक फटका

Continues below advertisement

उल्हासनगरची बाजारपेठ ही अगदी डोंबिवली ते बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गणेशोत्सवासाठी लागणारं सजावटीचं सामान, पूजासाहित्य, मखर इथपासून ते कपडे, धान्य अशा अनेक गोष्टी उल्हासनगरमध्ये अगदी सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्यानं उल्हासनगरमध्ये गणेशोत्सवापूर्वी मोठी गर्दी होत असते. गणेशोत्सवाला आता अवघे दोन दिवस राहिले असून या काळात तर एरव्ही उल्हासनगरच्या बाजारपेठेत अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसते. यंदा दुकानं सजली असली, तरी ग्राहकांची संख्या कमालीची रोडावल्याने बाजारपेठ ओस पडली आहे. दुकानात तुरळक ग्राहक दिसत असून व्यवसाय अवघ्या 25 टक्क्यांवर आल्याचं इथल्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यंदा कोरोनाच्या संकटामुळे या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram