Tahawwur Rana Arrest | तहव्वूर राणाची अटक भारताच्या दृष्टीने महत्वाची : उज्ज्वल निकम
तहव्वूर राणाची पुन्हा अटक होणं हे भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. कारण 26/11च्या हल्ल्याच्या कटात त्याचा सहभागी होता. त्याच्या विरोधात भक्कम पुरावा भारताकडे आहेत, तहव्वूर राणाच्या विरोधात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलेले आहे. त्याची अंमलबजावणी झाल्याचे या निमित्ताने पहायला मिळत आहे. या घटनेने तहव्वूर राणाला गुन्हेगार हस्तांतर कायद्याअन्वये भारतात आणणं सोपं होईल असं मत विशेष सरकार वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे