Hindi GR Withdrawal | १९ वर्षांनी Uddhav, Raj Thackeray एका मंचावर, 'विजय मेळाव्या'ची तयारी

५ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील एनएसीसीआय डोम, वरळी येथे 'विजय मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल १९ वर्षांनी एकाच मंचावर येणार आहेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन जीआर (GR) मागे घेतल्यामुळे हा 'विजय मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने हे जीआर मागे घेतल्याचा दावा ठाकरे गट आणि मनसेने केला आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात "आवाज मराठीचा, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो। सरकारला नमवलं, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही? मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात धुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय. आपले नम्र, राज ठाकरे, उद्धव ठाकरे." असे नमूद केले आहे. या पत्रकावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे आमंत्रित म्हणून नाव छापण्यात आले आहे. मराठी जनांनी सरकारला नमवल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola