Nana Patole Suspension : विधानसभेत रणकंदन, नाना पटोलेंचं निलंबन, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement
नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले. शेतकरीविरोधी वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते पवन लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुद्यावरून हा विषय सुरू झाला. नाना पटोले यांनी विधानभवनात थेट मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. "मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, अध्यक्ष महाराज," असे वक्तव्य पटोले यांनी केले. यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला. नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले आणि त्यांचे हात राजदंडापर्यंत पोहोचले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला. "एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे," असे फडणवीस म्हणाले. यानंतर सभागृहातला गोंधळ वाढला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करत असल्याची घोषणा केली. नाना पटोले यांच्या निलंबनानंतर विरोधकांनीही सभात्याग केला. "एक दिवस नाही रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही. उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू," असे पटोले यांनी सांगितले. जोपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे विरोधकांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा पुढील अंक ५ जुलै रोजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola