Narendra Patil | उदयनराजे, संभाजीराजे एकाच मंचावर? मराठा नेत्यांना एकत्र आणण्याचा नरेंद्र पाटलांचा प्रयत्न
मागील काही दिवसांपासून मराठा समाजातील नेत्यांमध्ये आरक्षण प्रश्नी वेगवेगळे मतप्रवाह सुरू झाल्याचं पाहिला मिळत आहे. हे मतप्रवाह थांबवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. नरेंद्र पाटील यांनी सर्व मराठा समाजातील नेत्यांना एकत्र एका मंचावर आणण्यासाठी बुधवारी वाशी येथील माथाडी भवन येथे सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे उपस्थित असतील.
Tags :
Maratha Aarakshan Narendra Patil Sambhajiraje New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Udayanraje Maratha Reservation