Electrical Workers Union Protest | मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचं ठिय्या आंदोलन, कामबंद आंदोलनाचा इशारा
सकाळपासून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचं ठिय्या आंदोलन मुंबईमध्ये सुरू होतं, अदानी इलेक्ट्रिसिटीमधील तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं. पुढील दोन दिवस ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा या युनियननं दिला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीमधील स्थायी आणि कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आजपासून पुढील 3 दिवस कामगार आयुक्त कार्यायासमोर ठिय्या आंदोलन आणि 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांना कायम करा आणि कोव्हिडं काळात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना विम्याची रक्कम द्या यासाठी रिलायन्स आणि अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात हे आंदोलन सुरू आहे.