वेळेवर रुग्णालय आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने दोन सख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू, कोल्हापुरात दिवसाला 25 ते 30 रुग्णांचे मृत्यू
Continues below advertisement
राज्यात ज्या पद्धतीनं आरोग्य व्यवस्थीची वाट लागलीय तशाच पद्धतीची परिस्थिती थोड्याफार प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतेय. आजही ऑक्सिजन मिळवण्यासाठी नागरिकांना धडपड करावी लागतेय. वेळेत मिळाला तर ठिक नाही तर मग मृत्यू ठरलेला आहे. कोल्हापूर शहरातील चव्हाण कुटुंबांनी या रुग्णालय न मिळण्याच्या त्रासानं दोन सख्या भावांना गमावलंय. आधी कृष्णा चव्हाण आणि सहा दिवसांच्या फरकानं चंद्रकांत चव्हाण यांचा मृत्यू झाला. आता दोन्ही भावंडांना वाचवण्यासाठी चव्हाण यांच्या भावांनी काय काय प्रयत्न केले ते ही ऐका.
Continues below advertisement