Tweet War : नवाब मलिक, नितेश राणेंच ट्विट वादात,महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर : ABP Majha
Continues below advertisement
विधानभवनाची हास्यजत्रा केल्यानंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना अतिशय खालची पातळी गाठली आहे.... सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्या ट्विटची... अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो ट्विट केला आणि त्याला पेहचान कौन असं शीर्षक दिलं.. तर आज नितेश राणेंनी देखील मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आहे. आणि ही प्रजाती फक्त भंगारात आढळते असा मजकूर त्याला जोडलाय.. अशा हिडीस पद्धतीनं एकमेकांवर टीका करताना नेते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विसरलेत का असा सवाल सर्व स्तरातून विचारला जातोय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Nawab Malik नवाब मलिक ट्विट Nitesh Rane नितेश राणे ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नितेश राणे