Nawab Malik: घरी 'सरकारी पाहुणे' येणार असल्याचं नवाब मलिकांचं सूचक ट्विट ABP MAJHA
ईडीने भाजप नेते किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केलंय का असा थेट सवालच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी आपल्या घरी ED किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं एक सूचक ट्वीट केल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वक्फ जमीन घोटाळाप्रकरणात भाजपच्या एका नेत्यावर कारवाई होणार असल्याचे भाकितही मलिक यांनी वर्तवलं.