Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान

नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अशोक खरात (Ashok Kharat) या ज्योतिषाला अटक केली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भोंदूबाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आहे आणि घाणेरडा आहे. अशोक खरातवर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे, त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत. त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कार्यवाही करणार आणि ते येणाऱ्या काळात दिसेल, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola