Pakistan suspends ‘all trade’ with India : भारताच्या निर्णयांची पाकिस्तानला मिर्ची, भारत संबंधांशी निगडीत पाकिस्तानने कोणते निर्णय घेतले?

Pakistan suspends ‘all trade’ with India :  भारताच्या निर्णयांची पाकिस्तानला मिर्ची, भारत संबंधांशी निगडीत पाकिस्तानने कोणते निर्णय घेतले?

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पाच मोठे निर्णय जाहीर केल्यानंतर आता पाकिस्तानची चांगलीच पंचायत होत असल्याचं चित्र आहे. भारताच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. सर्व भारतीय मालकीच्या किंवा भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत होणारा व्यापारही बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दहशतवादाविरोधात आता भारताने कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद केला. तसेच 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्यावर पाकिस्ताननेही भारताविरोधात सहा निर्णय घेतले आहेत. 

पाकिस्तानने कोणते निर्णय घेतले? 

  • भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही 
  • भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार. 
  • भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावं लागणार. 
  • वाघा अटारी बॉर्डर बंद. 
  • इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30वर आणणार. 
  • भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola